हिंगोली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जुन रोजी १३६ इनफन्ट्री बटालियन एइकोलॉजीकल महार रेजिमेंट चाली कंपनी हिंगोलीच्या वतीने जिल्हयातील दुघाळा परिसरातील माळरानावर तब्बल १० हजार वृक्षलागवड करण्यात आली, विशेष म्हणजे येथे परिसरात केलेली वृक्षलागवडीचे संवर्धन करण्यासाठी इंडियन आर्मीची ५० जणांची तुकडी नियमित काम पाहते. वृक्षांना पाण्याची सुद्धा सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी कर्नल विशाल रायजादा, सुभेदार राजेश गाडेकर, नायब सुभेदार विनोद पाटील सर्व आर्मी कर्मचारी, तसेच कै. विश्वनाथ बांगर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गजानन बांगर, ओम्साई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक वैभव कांबळे, सिंधू सेवाभावी संस्था अंधारवाडीचे अध्यक्ष प्रा. गोपाल भोस, इंन्स्पायर इंस्टिट्यूटचे प्रा. हार्दिक घुमनर, प्रा. ज्ञानेश्वर पठाडे, डॉ. प्रभाकर शिंदे तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.