Sunday, June 23, 2024
No menu items!
spot_img
Homeताज्या-बातम्यादेशातील सात शक्तिपीठांवर 9 ते 17 एप्रिल दरम्यान संगीत नाटक अकादमी आयोजित...

देशातील सात शक्तिपीठांवर 9 ते 17 एप्रिल दरम्यान संगीत नाटक अकादमी आयोजित करणार ‘शक्ती- संगीत आणि नृत्य महोत्सव’

देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी संगीत नाटक अकादमी आजपासून – म्हणजे 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत असलेल्या पवित्र नवरात्रात, कलाप्रवाह मालिकेअंतर्गत, ‘शक्ती- संगीत आणि नृत्य महोत्सव’ नावाचा महोत्सव भरवित आहे. नवरात्र म्हणजे नऊ देवींच्या सामर्थ्याचे द्योतक मानले गेले असल्याने, अकादमी ‘शक्ती’ या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा करत असून या अंतर्गत देशाच्या विविध भागांत 9 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत सात भिन्न शक्तिपीठांच्या ठिकाणी, मंदिर परंपरा साजरी करणारे कार्यक्रम होतील.

शक्ती महोत्सवाचा उद्घाटनपर कार्यक्रम गुवाहाटी येथे कामाख्या मंदिर येथे सुरू होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील ‘ज्वालामुखी मंदिर’, त्रिपुरामधील उदयपूर येथील ‘त्रिपुरसुंदरी’ मंदिर, गुजरातमध्ये बनासकांठा येथील ‘अंबाजी मंदिर’, झारखंडमधील देवघर येथील जलदुर्गा शक्तिपीठ येथे तो सुरू राहील. मध्यप्रदेशात उज्जैनमधील जयसिंगपूर येथील माॅं हरसिद्धी मंदिर या शक्तिपीठावर त्याचा समारोप होईल.

रंगमंचीय कलाविष्कारांची राष्ट्रीय अकादमी असणारी संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. देशातील रंगमंचीय कलाप्रकारांचे संरक्षण, त्यांवर संशोधन, त्यांना प्रोत्साहन आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आणि आदिवासी कला तसेच देशातील इतर कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर व्यक्त होणाऱ्या कलेसाठी ही संस्था काम करते‌.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments