Sunday, June 23, 2024
No menu items!
spot_img
Homeक्रीडाIND vs ENG 3rd Test: सिराजचा फटका, इंग्लंडला झटका; पाहुण्यांचा संघ 319...

IND vs ENG 3rd Test: सिराजचा फटका, इंग्लंडला झटका; पाहुण्यांचा संघ 319 वर ऑलआऊट! टीम इंडियाकडे मोठी आघाडी

भारताच्या गोलंदाजी आक्रमणासमोर इंग्लंडचं बॅझबॉल पूर्णपणे फिकं पडलं आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण डाव ३१९ वर संपुष्टात आणला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले आहेत. यासह भारतीय संघाने या सामन्यात १२६ धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंडचा डाव ३१९ वर संपुष्टात..

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ४४५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना सुरुवातीला २ मोठे धक्के दिले.मात्र त्यानंतर बेन डकेटने शतकी खेळी करत इंग्लंडला कमबॅक करुन दिलं. बेन डकेटने या डावात १५३ धावांची खेळी केली. बेन डकेटला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत इंग्लंडने २ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी इंग्लंडकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे धक्के दिले. २ गडी बाद २२४ धावसंख्या असताना भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या ३१९ धावांवर संपुष्टात आणला.

म्हणजे अवघ्या ९५ धावांवर इंग्लंडचे ८ फलंदाज माघारी परतले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर कुलदीप यादव रविंद्र जाडेजाने २ आणि जसप्रीत बुमरह, आर. आश्विनने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments